

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे ९० टक्के पुनर्मूल्यांकन (रिव्हॅल्यूएशन) आता पुर्ण झाले आहे. पुढील आठवडाभरात उर्वरीत सर्व निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मुल्यांकन विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली आहे.
हिवाळी सत्र परीक्षेपूर्वी सर्वच विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल घोषित होतील, असे परीक्षा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. अभियांत्रिकी, आर्किटेक्ट, कला, वाणिज्य शाखेतील पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण होऊन निकालही घोषित करण्यात आले आहे.
तर औषधनिर्माण आणि विज्ञान तंत्रज्ञान शाखेतील पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया आता अंतीम टप्प्यात आहे. डॉ. काकडे सांगतात, ‘‘विभागाच्या वतीने दिवाळीनंतर होणाऱ्या हिवाळी सत्र परीक्षेची तयारी करण्यात येत आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाचे निकाल मिळतील, जेणेकरून त्यांना पुढील सत्र परीक्षेत योग्य ते साहाय्य होईल.’’ पुनर्मुल्यांकनातील निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहनही परीक्षा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तर पुन्हा पेपर द्यायची गरज नाही.
जर विद्यार्थ्याने पुनर्मूल्यांकन निकालाच्या आधीच परीक्षा अर्ज भरला असेल, तर त्याने घाबरून जाऊ नये. निकाल घोषित झाल्यावर तो ज्या विषयात उत्तीर्ण असेल, त्या विषयाची परीक्षा पुन्हा देण्याची गरज नाही. संगणकीय पद्धतीने त्याचा निकाल पुन्हा अद्ययावत होईल. त्याला संबंधित विषयाचे परीक्षा शुल्कही परत केले जाईल, अशी माहिती संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे.
पुनर्मुंल्याकनाची सद्यःस्थिती
१) अभियांत्रिकी
- शेवटचे वर्ष निकाल घोषित
- दुसरे आणि तिसरे वर्ष ८० टक्के काम पूर्ण
- पहिले वर्ष पेपर तपासणी अंतिम टप्प्यात
२) एमबीए पेपर तपासणी सुरू
३) कला शाखेतील पदवी (बीए) निकाल घोषित
४) वाणिज्य शाखेतील पदवी (बीकॉम) निकाल घोषित
५) विज्ञान शाखेतील पदवी (बीएस्सी) ९० टक्के पूर्ण
६) आर्किटेक्ट निकाल घोषित
७) औषधनिर्माण पेपर तपासणी अंतिम टप्प्यात
८) विधी निकाल पूर्ण
समन्वय हवा..
कोरोनानंतर अजूनही विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक पूर्वपदावर आले नाही. ऑक्टोबर महिन्यात अपेक्षीत असलेल्या परीक्षांना नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा उजाडत आहे. पुनर्मूंल्याकन प्रक्रियेत विद्यार्थी एखाद्या वर्षासाठी पात्र ठरल्यास किंवा परीक्षेचा अर्ज भरल्यानंतर विषय उत्तीर्ण झाल्याचे समजल्यास महाविद्यालयांच्या परीक्षा अधिकाऱ्यांनी विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या परीक्षा विभागात समन्वय साधणे गरजेचे आहे. आधीच त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे काम सर्वच घटकांनी करायला हवे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.