पुणे विद्यापीठाची पदवी महागणार

Pune-University
Pune-University

पुणे - शिक्षणाचा खर्च वाढत असतानाच अव्यावसायिक व व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्कात अनुक्रमे ३० आणि २० टक्के शुल्कवाढ करावी, या मागणीचा ठराव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसमोर मांडण्यात आला आहे. हा ठराव मान्य झाला, तर पुणे विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शुल्कवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे.

विद्यापीठाची अधिसभा १४ डिसेंबर रोजी होणार आहे. अधिसभेचे सदस्य प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांनी शुल्कवाढीचा ठराव अधिसभेसमोर ठेवला आहे. पुणे विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठी अनुदानित कला व वाणिज्य शाखेसाठी दोन ते तीन हजार रुपये शुल्क आहे, तर विनाअनुदानितसाठी सुमारे सहा हजार रुपये शुल्क आहे. विज्ञान शाखेसाठी अनुदानित महाविद्यालयात तीन ते साडेतीन हजार रुपये, तर विनाअुनदानितसाठी आठ हजारांपर्यंत शुल्क आहे. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाचे शुल्क किमान २५ हजार रुपये आहे. शिक्षणाचा खर्च वाढत असताना पालक मेटाकुटीला आलेले आहेत, त्यातच हा शुल्कवाढीचा विषय समोर आला आहे.

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज 
विद्यापीठाकडे असलेला निधी केवळ बॅंकेत ठेवी स्वरूपात ठेवण्यापेक्षा त्यातील काही पैसा विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज स्वरूपात द्यावा, असा ठराव प्रा. शामकांत देशमुख यांनी अधिसभेत मांडला आहे. 

देशमुख म्हणाले, की अनेक विद्यार्थी आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने उच्चशिक्षण घेऊ शकत नाहीत. विद्यापीठाकडून दरवर्षी बॅंकेत मोठ्या रकमा ठेवी म्हणून ठेवल्या जातात. त्यातील काही हिस्सा विद्यार्थ्यांना कर्ज देण्यासाठी वापरता येऊ शकतो. वर्षाला तीन कोटींचा निधी दिल्यास किमान ३०० विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतील. अशी योजना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, आरोग्य विज्ञान विद्यापीठात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com