पुणे : विद्यापीठात होणार शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा; तारीख ठरली....

ब्रिजमोहन पाटील
मंगळवार, 28 जुलै 2020

"कोरोना'चे संकट ओढावल्याने शिक्षण क्षेत्रासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी पुणे विद्यापीठाने अवघ्या तीन ते चार महिन्यात ही "ऑनलाईन मॅनेजमेंट सिस्टीम' विकसित केली आहे. 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये काय शिकवले जात आहे, किती शिवकले, विद्यार्थी किती उपस्थित होते हे आत्तापर्यंत लक्षात येत नव्हते. मात्र, आता ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेल्य "ऑनलाईन मॅनेजमेंट सिस्टीम'च्या वापराने शक्‍य होणार आहे. तसेच त्याच्या नोंदीही ठेवता येणार आहे. दरम्यान, या नव्या प्रणालीच्या वापराने 5 ऑगस्टपासून पुणे विद्यापीठाने शैक्षणीक वर्षाचा "श्रीगणेशा' करण्याचा निर्णय घेतला आहे.

उच्च तंत्र शिक्षण विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुणे विद्यापीठातील इं कंटेन्ट निर्मीतीची माहिती घेत स्टुडीओला भेट दिली. त्यानंतर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी याबाबत माहिती दिली. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यावेळी उपस्थित होते.

हे वाचा - कोविडसाठी महापालिका प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची मानधनावर नियुक्ती करणार

"कोरोना'चे संकट ओढावल्याने शिक्षण क्षेत्रासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी पुणे विद्यापीठाने अवघ्या तीन ते चार महिन्यात ही "ऑनलाईन मॅनेजमेंट सिस्टीम' विकसित केली आहे. पहिल्या टप्प्यात याची 10 महाविद्यालयात चाचणी घेतली जाईल. त्यानंतर सर्व महाविद्यालयांना ही सुविधा मोफत दिली जाणार आहे. पुण्यासारख्या शहरापासून ते दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना याचा कमीत कमी रेंजमध्येही वापर करता येणार आहे. ज्या ठिकाणी कोणतीच सुविधा नाही अशा स्थितीत या विद्यार्थ्यांना पेनड्राईव्ह देण्यात येणार आहे.

पुणे विद्यापीठाने 40 टक्‍के अभ्यासक्रम ऑनलाईन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामध्ये 20 टक्‍के अभ्यासक्रम हा केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचे विकसीत केलेल्या "स्वयं'वरील अभ्यासक्रमा सारखा आहे. हा अभ्यासक्रम प्रमाणित करून घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली.यामध्ये प्रत्येक विद्याशाखेतील अभ्यासक्रमाचे ई साहित्य तयार करण्यात येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

5 ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने या यंत्रणेचा वापर करून अध्यापन सुरू केले जाणार आहे. प्राध्यापकांच्या व्हिडीओला आकर्षक ग्राफिक्‍स,ऍनिमेशनची जोड देण्यात आली आहे. प्रत्येक महाविद्यालयात वेगवेगळ्या पद्धतीने शिकवले जाते, त्यामुळे याची खबरदारी घेत एका महाविद्यालयाने तयार केलेले साहित्य, दुसऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी किंवा शिक्षकांना दिसणार नाही अशीही सुविधी केली आहे. तसेच व्हिडीओच्या प्रत्येक 10-15 मिनीटांनी विद्यार्थ्यांना प्रश्‍न विचारले जातील. त्याचे योग्य उत्तर दिले तरच व्हिडीओ पुढे जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थित लक्ष देऊन सर्व ऐकावे लागणार आहे.

"पुणे विद्यापीठाने अत्यंत चांगल्या पद्धतीने ई कंटेन्ट निर्मीती केली आहे. राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे साहित्य निर्माण केले जावे यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न असून, पुणे विद्यापीठाची यासाठी मदत घेतली जाईल.''
- प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री उच्च व तंत्रशिक्षण विभाग

पुणे विद्यापीठाने हे सर्व साहित्य "रूसा'च्या माध्यातून तयार उभारलेल्या स्टुडीओमध्ये तयार केले जात आहे. आत्तापर्यंत 3 हजार तासांपेक्षा जास्तचे व्हिडीओ येथे तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थी, प्राध्यापक, महाविद्यालये http://www.eclm.unipune.ac.in/ या संकेतस्थळावरील ई साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune university e content development and learning innovation centre