Exam Paper Reevaluation : निकालाआधीच द्यावी लागणार ‘परीक्षा'! विद्यार्थ्यांमध्ये संताप

पहिल्याच सत्रातील काही विषयांचा निकाल नापास आल्याने सुधीर चिंतेत होता. म्हणून त्याने त्या विषयांच्या उत्तरपत्रिकेची फोटो कॉपी मागवली.
savitribai phule Pune University
savitribai phule Pune Universityesakal

पुणे - पहिल्याच सत्रातील काही विषयांचा निकाल नापास आल्याने सुधीर चिंतेत होता. म्हणून त्याने त्या विषयांच्या उत्तरपत्रिकेची फोटो कॉपी मागवली. मात्र, पुन्हा पेपर देण्याची वेळ आली तरीही फोटोकॉपी मिळाली नाही. तर विधीच्या पाचव्या सत्रात शिकणाऱ्या अर्जुनला फोटोकॉपी मिळाली. परंतु, काही प्रश्न नीट तपासले नसल्याचे त्याने म्हटले आहे. आता पुनर्मूल्यांकनासाठी त्याने अर्ज केलाय पण त्याच विषयाची त्याला येत्या मंगळवारी परीक्षा द्यायची आहे. त्यामुळे निकालाची वाट पाहावी की पुन्हा पेपर द्यावा, या गर्तेत तो अडकला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील अनेक विद्यार्थ्यांची अशी विचित्र अवस्था झाली आहे. उशिरा लागलेले निकाल, हातात न मिळालेली फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकनाच्या निकालाची प्रतिक्षा, या संभ्रमावस्थेत विद्यार्थी असून, त्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. विधी विषयाचा अभ्यास करणारा तुषार सांगते,‘‘आमच्या पाचव्या सत्राची परीक्षा जानेवारीमध्ये झाली. नियमानुसार ४५ दिवसांत निकाल लागणे अपेक्षीत होते.

मात्र, ९० दिवसानंतर निकाल घोषित घाला. उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मागवली तर त्यात काही प्रश्नांना गुणदान केलेले दिसले नाही. तर काहींच्या मुल्यमापणावरच प्रश्नचिन्ह आहे. या संदर्भात परीक्षा विभागाला कळविले असता. त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. मात्र, विद्यार्थ्यांवरील झालेला अन्याय दूर कसा होणार.’’ परीक्षा व मूल्यमापन मंडळाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे कळविल्याचे भेट घेणाऱ्या विद्यार्थी संघटना सांगतात. पण यावर नक्की कसा तोडगा निघेल हा मोठा प्रश्न.

savitribai phule Pune University
BRT Route : पुणे शहरात बीआरटी मार्गावर खासगी वाहने सुसाट; प्रशासनाचे एकमेकांकडे बोट

विद्यार्थ्यांच्या अडचणी...

- अनेकांना अजूनही उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळाली नाही

- काहींना मिळाली तर रिव्हॅल्यूशनचा निकाल रखडला आहे

- पुन्हा परीक्षा द्यावी की निकालाची वाट पाहावी, हा यक्ष प्रश्न

- निकाला आधीच पुढच्या परीक्षेची तारीख

- अतिरिक्त अभ्यासाबरोबर मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते

- सर्व प्रक्रियेत आर्थिक आणि मानसिक त्रास

savitribai phule Pune University
Baramati: बारामतीत प्रथमच साकारणार 'हॅपी स्ट्रीटस बारामती 'उपक्रम.

फोटोकॉपी साठी अर्ज केला असता संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेतील कित्येक प्रश्न तपासण्यातच आले नव्हते. त्यावर गुणदान व्यवस्थित करण्यात आले नव्हते. परिणामी त्या विद्यार्थ्यांचा निकाल नापास असा आला. विद्यार्थ्यांनी पेपर फेर तपासणीसाठी दिले असून, दोन महिन्यानंतरही निकाल लावण्यात विद्यापीठ प्रशासन अयशस्वी ठरले आहे. या निष्काळजीपणाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे.

- शुभंकर बाचल, पुणे महानगर मंत्री, अभाविप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com