
Pune University
Sakal
पुणे : प्राध्यापक भरती न झाल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘राष्ट्रीय संस्थात्मक रॅंकिंग फ्रेमवर्क’च्या (एनआयआरएफ) क्रमवारीत घसरण झाल्याचे कारण सांगून विद्यापीठ प्रशासन जबाबदारी झटकत आहे. हा पुणे विद्यापीठाच्या वैभवशाली परंपरेतील ‘काळा दिवस’ आहे. त्यामुळे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य आणि अधिसभा सदस्य यांनी तत्काळ सामूहिक राजीनामे द्यावेत,’’ अशा मागणी युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे केली आहे.