विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष्य द्या; पुणे विद्यीपाठाची प्रथम सत्र परीक्षा एप्रिलमध्येच!

ब्रिजमोहन पाटील
Thursday, 4 March 2021

विद्यापीठाची परीक्षा प्रक्रिया ठप्प झाली आहे, पण ऑनालइन परीक्षेचे काम करण्यासाठी मोठा खर्च करून ‘एस.पी.पी.यू.एज्युटेक फाउंडेशन’ आणि एस.पी.पी.यू.रिसर्च पार्क’ याकंपन्या उभ्या केलेल्या आहेत.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी नव्याने एजन्सी नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाणार असून, पुढील १० दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या एजन्सीला तयारीला वेळ देणे, सराव परीक्षा घेणे ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवधी लागणार असल्याने विद्यापीठाची परीक्षा किमान १५ दिवस लांबणीवर पडणार असल्याने आता मार्च ऐवजी एप्रिलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तमिळनाडूत राजकीय भूकंप; शशिकलांचा राजकीय संन्यास!​

प्रथम सत्राची परीक्षा १५ मार्च पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पण परीक्षा घेण्यासाठीच्या एजन्सीवरून पेच निर्माण झाला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यावर निर्णय घेतला जात नसल्याने प्रक्रिया ठप्प झाल्याने विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी बुधवारी (ता. ३) कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन चर्चा करून यावर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. परीक्षेबाबत काय निर्णय घ्यायचा हे स्पष्ट केले जाईल, असे आश्‍वासन कुलगुरू करमळकर यांनी दिले आहे. दरम्यान याबाबत कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही.

याबाबत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे ‘‘आज कुलगुरूंची भेट घेऊन चर्चा केली. नियमाप्रमाणे मागण्या एजन्सीला कायम करता येणार नाही त्यामुळे नव्याने प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ८ ते १० दिवसांमध्ये पूर्ण होईल, त्यामुळे १५ दिवस परीक्षा पुढे जातील.’’

MPSCच्या उमेदवारांसाठी विशेष सूचना; पूर्व परीक्षेसाठी नवे प्रवेशपत्र करा डाऊनलोड!​

विद्यापीठाच्या कंपन्या काय करतात?
विद्यापीठाची परीक्षा प्रक्रिया ठप्प झाली आहे, पण ऑनालइन परीक्षेचे काम करण्यासाठी मोठा खर्च करून ‘एस.पी.पी.यू.एज्युटेक फाउंडेशन’ आणि एस.पी.पी.यू.रिसर्च पार्क’ याकंपन्या उभ्या केलेल्या आहेत. पण या कंपन्या हे काम करण्यास सक्षम नसतील तर त्या स्थापन करून काय उपयोग, प्रश्‍न अधिसभा सदस्य शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर, संतोष नानासाहेब ढोरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी कुलगुरूंकडे केली आहे.

बुमराह महाराष्ट्राचा जावई होणार की साउथचा? सोशल मीडियात चर्चांना उधाण​

युक्रांदचे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे म्हणाले, ‘‘विद्यापीठाचा परीक्षेच्या निर्णयात कायम गोंधळ होत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यावेळेस परीक्षेत व निकालात गोंधळ झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune University first term examination will be held in April 2021