

Student Misconduct at Pune University
Esakal
Pune Crime News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृह परिसरात विद्यार्थिनीला अडवून तिची चौकशी केल्याच्या प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने दोन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विभाग आणि वसतिगृहातील प्रवेश तत्काळ निलंबित केले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांविरोधात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.