काश्‍मिरींसाठी पुणे विद्यापीठ मदत करेल -डॉ. नितीन करमळकर

Pune University to help Kashmiris  says Dr. Nitin Karamalkar
Pune University to help Kashmiris says Dr. Nitin Karamalkar

पुणे -  ‘‘समाजात विधायक गोष्टी पेरण्यापेक्षा विघातक गोष्टी पसरविल्या जातात. त्यामुळे काश्‍मिरी नागरिकांची मने कलुषित झाली असतील, तर त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी इतर राज्यांना प्रयत्न करावे लागतील. तेथील तरुण-तरुणींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे लागेल, त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हातभार लावेल,’’ अशी ग्वाही कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

सरहद संस्थेने निर्मिती केलेल्या हिंदी-काश्‍मिरी भाषेच्या संभाषण शब्दकोशाचे प्रकाशन डॉ. करमळकर यांच्या हस्ते विद्यापीठात झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, संजय चाकणे, ‘सरहद’चे संजय नहार, शैलेश वाडेकर, शैलेश पगारिया, संजय सोनावणी, जाहीद भट पुस्तकाचे लेखक प्रशांत तळणीकर, सिराजुद्दीन खान आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘काश्‍मिरींना भारतभूमी आणि प्रत्येक माणूस आपला वाटला पाहिजे. हे वातावरण तयार करण्यात अडचणी येतात; पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. माणसे जोडावी लागतील. पुस्तके वा साहित्य हे त्याचे माध्यम आहे. त्यादृष्टीने हा शब्दकोश महत्त्वाचा वाटतो. काश्‍मिरी असो वा कोणतीही संस्कृती, ती सर्व संस्कृतीचा प्रवाह एकत्र येऊन बनलेली आहे, हे समजून घेतले तर अस्मिता बोथट होऊन संवाद वाढेल.’’

पांडे म्हणाले, ‘‘संवादांतून खूप चांगल्या गोष्टी घडतात. त्यामुळे काश्‍मीर आणि महाराष्ट्रासह देशभरातील अन्य राज्यांतील नागरिकांचा परस्पर संवाद वाढविण्यासाठी पुढाकार घेऊया. त्यासाठी विद्यापीठ काश्‍मिरातील तरुणांना पुण्यात आणून येथील मराठी संस्कृतीशी जोडणार आहे. तसेच विद्यापीठामार्फत तेथे कौशल्य विकासाचे अभ्यासक्रमही सुरू केले जातील.’’

काय आहे शब्दकोशात? 
संभाषण शब्दकोशाबाबत माहिती देताना प्रशांत तळणीकर म्हणाले, ‘‘भाषा कुठलीही असली, तरी नवख्या व्यक्तीला त्याचे उच्चार आणि अर्थबोध यांची समस्या असते. त्यादृष्टीने हा कोश तयार केला आहे. काश्‍मिरी भाषेतील दैनंदिन वापराचे वेचक शब्द, नाती, आकडे, कालवाचक शब्द, संवादासाठी वापरली जाणारी वाक्‍ये, म्हणी आणि वाक्‌प्रचार. त्यांचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अर्थ यात आहेत. काश्‍मिरीतील छोटीशी कथा, कविताही अर्थासह दिली आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com