पुणे विद्यापीठात ‘इंडो-फ्रेंच नॉलेज समिट’ | Pune University | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai Phule Pune University
पुणे विद्यापीठात ‘इंडो-फ्रेंच नॉलेज समिट’

पुणे विद्यापीठात ‘इंडो-फ्रेंच नॉलेज समिट’

पुणे - भारत आणि फ्रान्स यांच्यातील शिक्षण, संशोधन आणि नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुमे विद्यापीठाच्या वतीने ‘इंडो-फ्रेंच नॉलेज समिट’चे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या २४, २५ व २६ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने होणार असून, या परिषदेला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

फ्रान्सच्या अध्यक्षांनी २०१८ मध्ये भारताला भेट दिली होती. त्यावेळी फ्रान्स दूतावासातर्फे ही परिषद आयोजित केली होती. पहिली परिषद २०१८ ला दिल्लीत, दुसरी फ्रान्समधील लिऑन येथे २०१९ साली झाली. आता २०२१ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ही परिषद घेण्याचा मान मिळाला आहे. याऑनलाईन परिषदेत पहिल्या दिवशी केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान, फ्रान्सचे उच्चशिक्षण, संशोधन व नवसंशोधनमंत्री फेडरिक्यु विडाल, केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान व विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एम.रवीचंद्रन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आदी उपस्थितीत असतील.

हेही वाचा: पुणे : विद्यापीठ अल्युमिनाय आणि व्हिएम इंटलेकमध्ये सामंजस्य

परिषदेच काय होणार ?

या परिषदेत आरोग्य (संसर्गजन्य आजार), सागरी विज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता, शाश्वत ऊर्जा, हरित रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि नैसर्गिक संसाधने आदी विषयांवर चर्चा होणार आहे. यातून अनेक सामंजस्य करार, एकत्रित संशोधन प्रकल्प हाती घेण्यासंदर्भात ठराव केले जातील. या परिषदेत विज्ञान विषयात आवड असणारे सर्व जण सहभागी होऊ शकतात. या परिषदेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाच्या नवोपक्रम , नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले. लिंक- https://www.ifindia.in/knowledge-summit

loading image
go to top