प्रॉक्टर्डचा दणका, दीडशे कॉपीबहाद्दर सापडले; पुणे विद्यापीठ परीक्षेतील प्रकार

प्रॉक्टर्डचा दणका, दीडशे कॉपीबहाद्दर सापडले; पुणे विद्यापीठ परीक्षेतील प्रकार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी प्रॉक्टर्ड प्रणालीचा वापर करण्यात येत असल्याने त्याच कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना चांगलाच दणका बसला आहे. विद्यापीठाने दीडशे जणांवर आत्तापर्यंत कारवाई केली आहे. पुणे विद्यापीठातर्फे पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने प्रथम सत्र परीक्षा सुरू झाली आहे. विद्यापीठाने सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत कोणतेही नियंत्रण नसल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात कॉपी केली होती. त्यामुळे गुणवत्ता राखण्यासाठी विद्यापीठाने प्रॉक्टर्ड मेथडचा वापर करण्याचा निर्णय घेतला होत.

विद्यापीठाच्या परीक्षा १० एप्रिल परीक्षा सुरू झाली आहे. आत्तापर्यंत दीडशे विद्यार्थ्यांना विद्यापीठाने कॉपी करताना ऑनलाइन पकडले आहे. यापैकी एकाच दिवशी ७४ विद्यार्थ्यांना पकडले आहे.

प्रॉक्टर्डचा दणका, दीडशे कॉपीबहाद्दर सापडले; पुणे विद्यापीठ परीक्षेतील प्रकार
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण

यामध्ये कॉपी करताना प्रश्‍नपत्रिकेचा स्क्रीन शॉट काढणे, सामुहिक परीक्षा देणे, इंटरनेटवर प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणे, लॅपटॉवर दिसणाऱ्या प्रश्‍नपत्रिकेचा मोबाईलवरून फोटो काढणे अशा विविध पद्धतीने कॉपी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही अभियांत्रिकीचे विद्यार्थी सामुहीक ऑनलाइन परीक्षा देत असल्याचा प्रकारही समोर आला आहे. विद्यापीठाने कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली आहे. परीक्षा विभाग या विद्यार्थ्यांना तक्रार निवारण समितीसमोर बोलावून कारवाई करणार आहे.

‘‘प्रथम सत्र परीक्षेत आत्तापर्यंत सुमारे दीडशे विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. प्रॉक्टर्ड मेथडद्वारे विद्यार्थ्यांवर पूर्ण लक्ष दिले जात आहे. त्याचे फोटो देखील विद्यापीठाकडे आहेत. या विद्यार्थ्यांवर नियमाप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल. सोमवारी १ लाख ४२ हजार ६८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, उपस्थितीचे प्रमाण ९६ टक्के आहे.’’

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com