'ऑनलाईन व्हायवा'मुळे पुणे विद्यापीठाची झाली तब्बल दीड कोटींची बचत

Pune University saved one and half crore due to online PhD Viva
Pune University saved one and half crore due to online PhD Viva

पुणे : 'कोरोना'मुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडीच्या व्हायवा मुळे ब्रेक लागला होता. मात्र, आता कोरोना'मुळेच या व्हायवा ऑनलाईन घेण्याची वेळ आल्याने पुणे विद्यापीठाची तब्बल दीड कोटी रुपयांची बचत होणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १०२ जणांच्या ऑनलाईन व्हायवासाठी नोंदणी पूर्ण झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पुणे विद्यापीठासह इतर संस्था व देशातील विद्यापीठांमध्ये अनेक विद्यार्थी पीएचडी व एमफील करत आहेत. त्यातील संशोधन करणार्या काही विद्यार्थ्यांनी शोधप्रबंध विद्यापीठाकडे जमा केले आहेत. मात्र यांच्या व्हायवा होणार कशा असा प्रश्न पडला होता. त्यावर युजीसीने याबाबत परिपत्रक प्रसिध्द करून विद्यापीठांना ऑनलाईन व्हायवा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

पुणे विद्यापीठातून दरवर्षी साधारणपणे ८०० जण पीएचडी प्राप्त करतात. यासाठी येणारे मार्गदर्शक, बाह्य परीक्षक यांचा प्रवास खर्च, निवास खर्च यासाठी मोठा खर्च होत. काही परीक्षक हे देशाच्या कोणत्याही राज्यातून येतात, त्यामुळे विमान प्रवास खर्च मोठा होता. तसेच त्यांचे व्हायवाच्या निमित्ताने किमान तीन दिवस त्यात जात होते. या सर्व प्रक्रियेत विद्यापीठाला किमान दीड कोटी रूपये खर्च येत होता. ऑनलाईन व्हायवा मुळे या सर्व खर्चाला ब्रेक लागला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाह्य परीक्षक महाविद्यालयातील नको !
विद्यार्थी, विषय तज्ज्ञ, रिसर्च ऑथोरिटी कमिटी, संबंधित विभागातील सर्व प्राध्यापक,तसेच संबंधित विषयाचे अभ्यासक हे ऑनलाईन 'व्हायवा' प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. पण यामध्ये बाह्य परिक्षक हा विद्यार्थ्याच्या महाविद्यालय किंवा संशोधन संस्थेच्या बाहेरील असला पाहिजे असे यूजीसीने स्पष्ट केले आहे. 

संशोधनास सहा महिने मुदतवाढ
राज्यातील विद्यापीठे व संशोधन संस्था करोनामुळे मार्च पासून बंद आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य मागे पडले आहे किंवा रखडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य करून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्मण विद्यापीठाने घेतला आहे. 

नागरिकांनो, अफवांवर विश्वास ठेवु नये! 140 क्रमांकाबाबतच्या संदेशात तथ्य नाही

"पुणे विद्यापीठाने ऑनलाईन व्हायवासाठी तयारी केली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्या पर्यंत १०२ मुलाखती होणार आहेत. त्याचे वेळपत्रकही निश्चित झाले आहे. यापुढील इतरांचे वेळापत्रक ही ठरत आहे. यापूर्वी व्हायवासाठी दीड कोटी रुपये खर्च येत होता. आता तो कमी होणार आहे."
- उत्तम चव्हाण, उप कुलसचिव, पुणे विद्यापीठ


- प्रवास खर्च, निवास खर्च यासह इतर भत्त्यांचा खर्च कमी
- बाह्य परीक्षकांची वेळेची बचत
- विद्यार्थ्यांचाही खर्च कमी झाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com