pune university School Work speed will increase
pune university School Work speed will increase

विद्यापीठाच्या 'प्रशालां'च्या कामकाजाला येणार गती 

पुणे : राष्ट्रीय विद्यापीठांप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'प्रशाला' (स्कूल सिस्टीम) स्थापन करण्यात  आल्यानंतर आता त्याच्या कामाला गती देण्यासाठी विद्यापीठाच्या अंदाजपत्रकात ८० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रशालेसाठी ३ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुणे विद्यापीठाच्या उत्पन्नाला घरघर लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कपात करत ५९३ कोटी ५४ लाख १५ हजार रुपयांचा अंदाजपत्रक मंजूर करण्यात आला आहे.  हा अर्थसंकल्प ५२ कोटी रुपयांचा तुटीचा असल्याने उत्पन्न घटल्याने अनेक योजना, संशोधन प्रकल्प, विकास कामे यांच्या निधीत मोठी कपात करण्यात आली आहे. मात्र, 'प्रशालां'साठी अर्थसंकल्पात प्रथमच तरतूद करण्यात आली आहे. 

पुणे विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन करण्यात आले त्यावेळी 'प्रशााल पद्धती' सुरू करण्याची सूचना नॅक समितीने केलेली आहे, त्यामुळे गतवर्षी ५२ शैक्षणिक विभागांची मिळून १८ प्रशाला स्थापन करण्यात आल्या आहेत. 

प्रशाला स्थापन करताना त्यात सहभागी असणाऱ्या विभागाचे अस्तित्व कायम ठेवत स्वतंत्र तरतूद ही करण्यात आलेली आहे. प्रशाले अंतर्गत घेण्यात येणारे कार्यक्रम, परिषदा, बैठका यांच्यासाठी ही तीन लाखाची तरतूद उपयुक्त ठरणार आहे. 

फिजिकल सायन्ससाठी सर्वाधिक तरतूद

विद्यापीठातील १८ पैकी १७ प्रशालां'साठी प्रत्येकी ३ लाखाची तरतूद आहे. मात्र स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेससाठी सर्वाधिक २८ लाखाची तरतूद आहे. त्यात ३ लाख देखभाल दुरुस्तीसाठी आणि २५ लाख रुपये सोलार थर्मल प्लांटलाठी देण्यात आले आहेत. तर दुसऱ्या एका हडे खाली याच प्लांटलाठी ७५ लाख अशा प्रकारे एकाच प्रकल्पासाठी १ कोटीची तरतूद उपलब्ध करून दिली आहे. 

प्रशाला म्हणजे काय? 
प्रशाला म्हणजे विद्यापीठात काही प्रमाणात समान अभ्यासक्रम शिकविणाऱ्या विभागांना एकत्र करून त्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा वाढविला जातो. उदाहरणार्थ मराठी, हिंदी, पाली या विभागांसाठी स्कूल ऑफ इंडियन लँग्वेज स्थापन केले आहे तर  स्कूल ऑफ सोशल सायन्सेस मध्ये मानवशास्त्र विभाग, संरक्षण व सामारिक अभ्यास विभाग, अर्थशास्त्र, इतिहास यासह ८ विभाग एकत्र आहेत. या विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी यांना एकमेकांना माहिती देता येईल, नवा अभ्यासक्रम शिकता येईल. 

हेही वाचा : PAN-आधारशी लिंक झालं की नाही? असं तपासा स्टेटस  

"प्रशाला स्थापन केल्याने विद्यापीठातील प्रयोगशाळा व इतर सुविधा यांचा प्राध्यापक, विद्यार्थी यांना उपयोग येईल. वैचारिक देवाणघेवाण वाढणार असल्याने त्याचा फायदा  संशोधन वाढविण्यासाठी होईल. स्कुल सिस्टीमसाठी निधी उपलब्ध केला तरी प्रत्येक विभागाचे अधिकार, स्वातंत्र्य कायम आहे. स्कुलचे संचालक हे दूवा म्हणून कार्यरत असणार आहेत."
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com