esakal | पुणे विद्यापीठाची दुसऱ्या सत्रातील परीक्षा आजपासून
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

पुणे विद्यापीठाची दुसऱ्या सत्रातील परीक्षा आजपासून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील दुसऱ्या सत्रातील परीक्षा सोमवारपासून (ता. १२) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी आतापर्यंत साधारणतः: सहा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या अंतर्गत सोमवारी विज्ञान, अभियांत्रिकी, वाणिज्य, वास्तुविशारद, विधी या विद्या शाखांमधील ७४ पेपर होणार आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र आणि इतर अशा एकूण २८४ अभ्यासक्रमांसाठी चार हजार १९५ विषयांसाठी ही बहुपर्यायी पद्धतीने ऑनलाइन परीक्षा होणार आहे.

हेही वाचा: लस अपुरी; पुण्यात फक्त ६८ केंद्रांवर आज लसीकरण

आजच्या परीक्षेचा तपशील

विद्याशाखा : एकूण पेपर : एकूण परीक्षा

विज्ञान : ३६ : २८,६५५

अभियांत्रिकी : १५ : ४३,७७६

वाणिज्य : १३ : ९६२

वास्तुविशारद : ०४ : १,२७८

विधी : ०६ : २,१३३

परीक्षेची वैशिष्ट्ये

  • बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील

  • ६० प्रश्नांची ऑनलाइन परीक्षा असेल, त्यातील ५० प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरली जातील

  • विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील गणित व संख्याशास्त्र विषयांसाठी एकूण ३० प्रश्न असून त्यातील २५ प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरली जातील

loading image