esakal | Pune: विद्यापीठात लवकरच ‘स्पोकन संस्कृत’ अभ्यासक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

पुणे : विद्यापीठात लवकरच ‘स्पोकन संस्कृत’ अभ्यासक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच स्पोकन संस्कृत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. संस्कृत विषयाची गोडी लागावी व त्यामध्ये संवाद वाढवा यासाठी विद्यापीठ संस्कृत विषयात लवकरच प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करणार आहे.

विद्यापीठ आणि श्री सद्गुरू ग्रुप यांच्यात यासंबंधीचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कुलगुरू प्रा.डॉ.नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, संस्कृत व प्राकृत विभागाचे प्रमुख प्रा.देवनाथ त्रिपाठी, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, श्री सद्गुरू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

हेही वाचा: माझ्यासाठी काम करणाऱ्यांसाठी मी जीव तोडून काम करणार - डॉ. कोल्हे

पुर्णवेळ अभ्यासक्रमात आपले काम सांभाळून प्रत्येकालाच संस्कृत विषयाचे शिक्षण घेणे शक्य होत नाही. म्हणून आपण हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करत आहोत. यामुळे संस्कृत विषयाची गोडी वाटून त्यात संवाद वाढेल.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

अभ्यासक्रमाविषयी माहीती

नाव - सर्टिफिकेट कोर्स इन स्पोकन संस्कृत

कालावधी- ३० तास

स्वरूप- ऑनलाईन/ऑफलाईन

विद्यार्थी क्षमता- ५०

अधिक माहिती- www.unipune.ac.in

loading image
go to top