पुणे विद्यापीठातर्फे वारीत स्वच्छ भारत अभियान दिंडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

पुणे - आषाढी वारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘स्वच्छ आणि स्वस्थ भारत अभियान दिंडी’ सहभागी होत आहे. यात विविध महाविद्यालयांतील तीनशे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून सहभागी होणार आहेत. हे विद्यार्थी ‘आळंदी ते पंढरपूर’ असा प्रवास करत पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी पोस्टर्स, फलक आणि पथनाट्याद्वारे जागृती करणार आहेत.

संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीमार्गावर ही दिंडी कार्यरत असेल. दिंडीत सहभागी होणारे तीनशे विद्यार्थी या दोन्ही मार्गांवर दरवर्षीप्रमाणे सुरवातीपासून शेवटपर्यंत मार्गक्रमण करणार आहेत. विद्यार्थी येत्या मंगळवारपासून (ता. ३) ते ३० जुलैदरम्यान या दिंडीत सहभागी होतील. 

पालखी सोहळ्यात विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘स्वच्छ आणि स्वास्थ्य भारत अभियान दिंडी’ गेली १४ वर्षे सहभागी होत आहे. या निमित्ताने दिंडीत सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांना राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेची माहिती होते. राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील १५० स्वयंसेवक, शिक्षक आणि अन्य विद्यापीठांतील १५० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिली.

Web Title: Pune University Swachh Bharat Abhiyan Dindi