पुणे विद्यापीठाने करून दाखविले; कोरोनामुळे सुरक्षितपणे परीक्षा घेण्याचे होते मोठे आव्हान

Pune University took the online entrance exam of student form home
Pune University took the online entrance exam of student form home

पुणे : 'कोरोना'मुळे सुरक्षितपणे परीक्षा कशा घ्यायच्या याचे आव्हान असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मात्र हे करुन दाखवले आहे. 'प्राॅक्टर्ड मेथड टेस्ट' या प्रणालीच्या वापरानेघरबसल्या १ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा विना अडथळा ऑनलाईन दिली. आता विद्यापीठाने २६ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे.

...तर हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करा; उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश​

'कोरोना' महामारी मुळे एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. यानंतर ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा घेण्यावरून बरीच चर्चा झाली. सर्व विद्यार्थ्यांना नेटवर्क उपलब्ध नसल्याने ऑनलाईन परीक्षेचा प्रस्ताव मागे पडला. तर सुरक्षेच्या कारणास्तव ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यावरून निर्माण झालेला गोंधळ अद्याप शमलेला नाही. अंतीम वर्ष सोडून इतर वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी बॅकलाॅग आणि अंतिम वर्ष परीक्षांवर वाद आहे. आता या परीक्षांचे भवितव्य न्यायालयाच्या आदेशावर ठरणार आहे. 

पुणे विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर पदवी  पदव्युत्तर पदविका/प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची प्रवेश प्रक्रिया सुरू केली. पण परीक्षा कशी घेणार हा प्रश्न कायम होता. त्यासाठी पुणे विद्यापीठाने 'प्राॅक्टर्ड टेस्ट ' या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी (ता.१६) सकाळी ८ ते रात्री ८ या वेळात विद्यार्थ्यांच्या सवडीने एका तासाची प्रवेश परीक्षा घेण्यात आली. यामध्ये 

मोठी बातमी : पुण्यात कोरोना रुग्णांबाबत नोंदविले गेलेत दोन रेकॉर्ड; वाचा सविस्तर​ 

१५ पदवी अभ्यासक्रमांमधील ५१४जागांचा समावेश होता. नोंदणी केलेल्या १ हजार ३४० पैकी १ हजार १४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. ८५ टक्के विद्यार्थ्यांना कोणतीही तांत्रिक अडचण न येता त्यांनी परीक्षा दिली, असे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी सांगितले. 

पदव्युत्तर पदवीची तयारी सुरू 
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा २३ हजार १३२ तर पदव्युत्तर पदविकेसाठी ३ हजार ३०९ अर्ज आले आहेत. पदवी प्रवेश परीक्षेच्या निमित्ताने 'प्राॅक्टर्ड टेस्ट'ची प्रायोगिक तत्वावरील चाचपणी यशस्वी झाल्याने आता पुढच्या टप्प्यात पदव्युत्तर पदविका व पदव्युत्तर पदवीची प्रवेश परीक्षा घेण्याचे नियोजन पुणे विद्यापीठाने सुरू केले अाहे. विद्यार्थी संख्या जास्त असल्याने दोन ते तीन दिवस या परीक्षा चालण्याची शक्यता आहे," असे चव्हाण यांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यातील नागरिकांनो सतर्क राहा; हवामान विभागानं दिलाय 'ऑरेंज अलर्ट'!​

'प्राॅक्टर्ड टेस्ट'द्वारे नियंत्रण

'प्राॅक्टर्ड टेस्ट' या प्रणालीद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याचा 'लाॅगइन आयडी' तयार करण्यात आला. मोबाईल, लॅपटॉप, टॅब, काॅम्प्युटरवर कमीत कमी रेंजमध्येही लाॅगईन करता येते. ज्या ठिकाणी हा विद्यार्थी परीक्षेला बसला आहे, तेथून तो जागेवरून हलू शकत नाही. जागेवरून उठल्यास किंवा गैरप्रकार करत असल्याचे लगेच संबंधित यंत्रणेला त्याची माहिती मिळते. तीन वेळा त्याला सूचना देऊन तरीही सुधारणा न झाल्यास विद्यार्थ्याला परीक्षा देता येत नाही."

प्रवेश परीक्षा दृष्टीक्षेपात
पदवी अभ्यासक्रम : १५ 
प्रवेश क्षमता : ५१४ 
प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी : १३४०
परीक्षा दिलेले विद्यार्थी : ११४६
परीक्षेचा कालावधी : १ तास

    
शाखा             विभाग संख्या      क्षमता     दाखल अर्ज 
वाणिज्य व व्यवस्थापन - २           -   २२०    -   ११४४
मानव विज्ञान               - १७        -   ११७५   -   ४३७४
आंतरविद्याशाखीय अभ्यास - ७    -    ६१६    -   १८५६
विज्ञान तंत्रज्ञान            -     २२    -    १३४२  -  १७१०४
प्रमाणपत्र पदविका       -  ६६       -  ३३०९ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com