पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क करणार परत

Pune University
Pune University

पुणे - कोरोनामुळे गेल्या वर्षी अंतिम वर्ष वगळता इतर वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला होता. या विद्यार्थ्यांची परीक्षा न झाल्याने त्यांचे परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. मात्र ही प्रक्रिया राबविताना झालेला खर्च यातून वगळण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी परीक्षा शुल्क परत करावे, यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सभागृहाच्या दाराला धक्के मारून कडी तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यामुळे बैठकीच्या कामात अडथळा निर्माण झाला. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर व सदस्यांनी अशा प्रकारे आंदोलन करणे योग्य नाही असे कार्यकर्त्यांना सांगितले. तरीही सभागृहात घोषणाबाजी करून कामकाज ठप्प करण्याचा प्रयत्न केला. 

अंतिम वर्ष वगळता इतर वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत; पण या प्रक्रियेसाठी खर्च झालेला आहे. त्यामुळे हा खर्च वगळून उर्वरित रक्कम परत करावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. वारसा स्थळ असलेल्या वास्तूमध्ये अशा प्रकारे आंदोलन केल्याने याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली जाणार आहे, असे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी सांगितले. 

कुचकामी सुरक्षा व्यवस्था
विद्यापीठाकडून सुरक्षेसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. गणवेशधारी सुरक्षारक्षक जागोजागी तैनात आहेत; पण व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असताना, दाराला धक्के मारताना सुरक्षा यंत्रणेने त्यांना रोखले नसल्याने हे कार्यकर्ते दाराची कडी तोडून आतमध्ये गेले. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com