

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना अखेर अवकाळी पावसाने मोठा दिलासा दिला आहे. शहरात अचानक गारांसह पावसाची जोरदार हजेरी लागल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी याचा मनमुराद आनंद घेतला. भारतीय हवामान विभागाने याआधीच २० ते २४ एप्रिलदरम्यान राज्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार पुण्यासह राज्यातील अनेक भागांत पावसाची नोंद झाली आहे.