esakal | पुणे : ठेकेदारांची मजल दक्षता विभागापर्यंत
sakal

बोलून बातमी शोधा

pune

ठेकेदारांची मजल दक्षता विभागापर्यंतच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अधिकाऱ्यांनी कामाची फाइल लवकर मान्यतेसाठी पाठवावी, बिल लवकर निघावे यासाठी ठेकेदार, नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते फाइल घेऊन महापालिकेत फिरत असतात. मात्र, आता त्यांची मजल थेट गोपनीय काम करणाऱ्या दक्षता विभागापर्यंत गेली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम थेट कामकाजावर होत असल्याने यापुढे केवळ महापालिकेचे कर्मचारी किंवा सेवकच दक्षता विभागात फाइल आणतील असे आदेश प्रशासनाने काढले आहेत.

महापालिकेकडून ड्रेनेज, पाणी पुरवठा, कचरा, रस्ते, राडारोडा उचलणे, सुरक्षा रक्षक व इतर मनुष्यबळ पुरविणे, विविध प्रकारचे साहित्य पुरविणे यासह अनेक कारणांचे हजारो निविदा काढल्या जातात. निविदा काढण्यासाठी रक्कम उपलब्ध करून घेणे, कामाचा प्रस्ताव तयार करून घेऊन तो विभाग प्रमुखांसह अतिरिक्त आयुक्त, आयुक्तांच्या मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे जाण्याची प्रक्रिया पार पाडावी लागते. यामध्ये दक्षता विभागाकडून प्रस्तावातील अनियमितता टाळण्यासाठी तपासणी करून घेतली जाते. त्यानंतरच पुढे निर्णय होते. कामांमध्ये अनियमितता आढळल्यास तसा शेरा मारून अशा फाइल आयुक्‍तांकडे पाठविल्या जातात.

हेही वाचा: कंगना राणावत CM योगींच्या भेटीला! राजकारण की मनोरंजन? चर्चांना उधाण

दक्षता विभागाचे काटेकोरपणे व्हावे यासाठी गोपनीयता बाळगली जाते. मात्र, सध्या महापालिकेत दक्षता विभागातून फाइल तपासून लवकर बाहेर यावी यासाठी ठेकेदार, नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते धडपड करत आहेत. हा प्रकार निदर्शनास आल्याने दक्षता विभागात महापालिकेचा सेवक व कर्मचारी यांच्याकडूनच फाइल स्वीकारल्या जातील, असे आदेश उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी काढले आहेत.

अनेक प्रस्ताव अर्धवट

प्रशासनाकडून प्रस्ताव पाठवताना कागदपत्रांची पूर्तता न केल्याने असे प्रस्ताव अडकून पडतात. त्यामुळे दक्षता विभागात प्रस्ताव किंवा कामाची फाइल पाठवताना काय काय आवश्‍यक आहे याची यादी देखील मुठे यांनी परिपत्रकात दिली आहे.

loading image
go to top