

A three-foot-deep pothole formed after the road caved in at the Upper Indiranagar area of Pune.
esakal
Pune Road Suddenly Collapses in Upper Indiranagar : पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांची अनेकदा चर्चा होत असते पण सध्या सोशल मीडियावर अप्पर इंदिरानगर परिसरातील मुख्य रस्त्यावरील एका अनोखा खड्डा खूप व्हायरल होत आहे. परिसरात मुख्य रस्ता अचानक खचल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सतत वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या रस्त्याच्या मध्यभागी तब्बल तीन फूट खोल खड्डा पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एका पुणेरी काकांनी थेट खड्ड्यात उतरून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.