Arattai vs WhatsApp: स्वदेशी ॲप ‘Arattai’ कोणत्या बाबतीत आहे ‘WhatsApp’पेक्षा वरचढ!

Swadeshi Messenger App Arattai : व्हॉट्सॲप सारख्या ग्लोबल प्लॅटफॉर्मला आव्हान देणारे हे ॲप युजर्सला काही असे फीचर्स प्रदान करते, जे सद्यस्थितीस व्हॉट्सॲपमध्येही उपलब्ध नाहीत.
Arattai App – India’s swadeshi messaging platform competing with WhatsApp on privacy and features.

Arattai App – India’s swadeshi messaging platform competing with WhatsApp on privacy and features.

esakal

Updated on

What is Arattai App? : डिजिटल कम्युनिकेशनच्या युगात भारताने आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल उचललं आहे. याच संदर्भात जोहोने Arattai हे स्वदेशी ॲप विकसित केले आहे. Arattai हे एक स्वदेशी मेसेंजर ॲप असून, जे भारतात WhatsAppला पर्याय म्हणून ओळखलं जात आहे. व्हॉट्सॲप सारख्या ग्लोबल प्लॅटफॉर्मला आव्हान देणारे हे ॲप युजर्सला काही असे फीचर्स प्रदान करते, जे सद्यस्थितीस व्हॉट्सॲपमध्येही उपलब्ध नाहीत. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात, Arattai कोणत्या बाबतीत WhatsApp पेक्षा वरचढ आहे. 

१. विना मोबाइल नंबर चॅटिंग -

Arattaiचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे की, यामध्ये तुम्ही तुमचा मोबाइल नंबर शेअर न करताही कुणाचीही चॅट करू शकतात. युजर्स केवळ आपलं यूनिक युजरनेम बनवून कोणत्याही अज्ञात व्यक्तीशी बोलणं सुरू करतो. याशिवाय फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आणि लोकेशन देखील शेअर करणं सोपं आहे. व्हॉट्सॲपमध्ये या सुविधेचा पर्याय सध्या नाही.

२. मीटिंग फीचर  -

Arattaiचा युजर्स विशेष मीटिंग क्रिएट करू शकतो. हे व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलपेक्षा वेगळे आहे आणि बिझनेस मिटींग आणि ग्रुप डिस्कशनसाठी वापरले जाऊ शकते. तर व्हॉट्सॲपमध्ये मिटींगसाठी केवळ कॉल लिंक किंवा शेड्यूलिंगची सुविधा मिळते.

Arattai App – India’s swadeshi messaging platform competing with WhatsApp on privacy and features.
Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

३. Mentions आणि Notifications -

Arattaiचं  Mentions फीचर यूजर्सला हे दर्शवते की, त्यांना कोणत्या कोणत्या चॅट्समध्ये मेन्शन केलं गेलं आहे. हे फिचर विशेषकरून बिझी चॅट्स ग्रुपसाठी विशेष उपयोगी आहे. तर व्हॉट्सअॅपमध्ये मेन्शनला पाहण्यासाठी कोणताही एकत्रित पर्याय नाही.

४. पॉकेट फिचर-

Arattaiचं पॉकेट फिचर महत्त्वपूर्ण मेसेज, मीडिया आणि नोट्सना सुरक्षितरित्या क्लाउडमध्ये स्टोर करत आहेत.  यूजर यांना नंतर कोणत्याही डिवाइसने सहजरित्या मिळवू शकतो. तर व्हॉट्सअॅपमध्ये मेसेज किंवा मीडियाचे प्रोटेक्टेड स्टोरेज उपलब्ध नाही.

Arattai App – India’s swadeshi messaging platform competing with WhatsApp on privacy and features.
Chhatrapati Sambhajinagar murder case : छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मुलांसमोरच वडिलाची निर्घृण हत्या

५.उत्कृष्ट प्रायव्हसी कंट्रोल –

Arattaiमध्ये प्रायव्हसीचे अनेक ऑप्शन्स आहेत, जसं की लास्ट सीन आणि ऑनलाइन स्टेटस लपवणं, ग्रुपमध्ये ॲड करणं किंवा कॉल करण्याची परवानगी निश्चित करणे. सर्वात खास आहे, Username फिचर ज्याद्वारे युजर आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स विना नंबर सांगता शेअर करू शकतो. तर व्हॉट्सॲपमध्ये हा पर्याय उपलब्ध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com