

Vadgaon Maval Court Sentences Eight Accused to Life Imprisonment
esakal
रस्त्यावरील किरकोळ वादातून एका तरुणावर लाकडी दांडक्यांसह इतर वस्तूंनी जीवघेणा हल्ला करून त्याचा खून केल्याप्रकरणी वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १९ जानेवारी २०२१ रोजी शुभम विलास डोंगरे या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सरकारी पक्षाने सादर केलेले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरले.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा