
पुणे : पुण्यातील वानवडी परिसरात स्लॅब कोसळला आहे. सदर दुर्घटना सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडला असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे आणि पाच मजूर जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे.
(Pune Building Slab Collapse)
वानवडीमधील विकासनगर येथील बांधकाम चालू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला असून सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
वानवडीमधील विकासनगर येथे चालू असलेल्या भोर कम्युनिटी हॉलचा भाग कोसळला असल्याचं माहितीतून समोर येत आहे. दरम्यान स्लॅब टाकणयाचं काम सुरु होतं. हे काम सुरु असताना अपघात घडला असून ओल्या स्लॅबखाली कुणी अडकलं आहे का याचा शोध सुरु असल्याचं सांगितलं जातंय.
या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून जखमींपैकी बरेचजण परराज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान अग्निशामक आणि पोलिस दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.