Express Way : ‘वंदे भारत’पेक्षा ‘एक्स्प्रेस वे’वर वाहने सुसाट; ताशी १८० च्या वेगाची नोंद

काळजाचा ठोका चुकविणाऱ्या ताशी १८० किलोमीटर वेगाने वाहन चालविणारे हे वाहनचालक स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात आणत आहेत.
Express Way Speed
Express Way Speedsakal
Summary

काळजाचा ठोका चुकविणाऱ्या ताशी १८० किलोमीटर वेगाने वाहन चालविणारे हे वाहनचालक स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात आणत आहेत.

- प्रसाद कानडे

पुणे - भोपाळ-नवी दिल्ली दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस देशात सर्वाधिक म्हणजेच ताशी १६० किलोमीटर वेगाने धावते. मात्र, या सेमी हायस्पीड रेल्वेलाही मागे टाकण्याची करामत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर काही वाहनचालक करीत आहेत.

काळजाचा ठोका चुकविणाऱ्या ताशी १८० किलोमीटर वेगाने वाहन चालविणारे हे वाहनचालक स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात आणत आहेत. अशा करामती रोखण्यासाठी परिवहन विभाग पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहनांवर कारवाई करीत असून, अवघ्या तीन महिन्यांत २३ हजार वाहनांवर कारवाई केली आहे. वाढत्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न चालू आहेत. यात चालकांचे प्रबोधन सुरूच आहे, शिवाय चालकांच्या झिंगाट वेगाला कारवाईची मात्रादेखील दिली जात आहे. परिणामी अपघातांच्या संख्येत घट झाली आहे. असे असताना काही वाहनचालक बेभान होऊन वाहने दामटत आहेत. द्रुतगती मार्गावर ताशी १०० किमी वेगाची मर्यादा आहे. मात्र, वाहनचालक त्याची तमा न बाळगता सुसाट वाहने चालवीत आहेत.

दोन हजारांचा दंड!

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर चारचाकीला ताशी १०० किमीची, तर अवजड व मोठ्या वाहनांना ताशी ८० किमीची वेग मर्यादा आहे. घाटात वेगाची मर्यादा याहून कमी आहे. चारचाकीला ५०, तर जड वाहनांना ४० किमीची वेग मर्यादा ठरवून दिली. परंतु, अनेक वाहनचालक दोन्ही ठिकाणी वेग मर्यादा पाळत नाहीत. डिसेंबर २२ ते फेब्रुवारी २३ या तीन महिन्यांत पाच हजार १८ वाहनांनी अति वेगाने वाहन चालवून वेग मर्यादेचे उल्लंघन केले. या वाहनांवर प्रत्येकी दोन हजारांचा दंड आकारण्यात आला.

‘आरटीओ’ची २४ तास नजर...

पुणे, पिंपरी-चिंचवड व पनवेल आरटीओच्या वायुवेग पथकाचे कर्मचारी २४ तास द्रुतगती मार्गावर नजर ठेवून आहेत. यासाठी आठ इंटरसेप्टर वाहनांची मदत घेतली जाते. यातील कॅमेऱ्याद्वारे वाहनांवर नजर ठेवून कारवाई केली जाते. तीन महिन्यांपासून दररोज कारवाई सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण ३३ टक्क्यांनी घटले.

तीन महिन्यांत सुमारे २३ हजार वाहनांवर कारवाई केली. यात सार्वधिक संख्या ही अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांची आहे. वाहनांवर नजर ठेवण्यासाठी आठ इंटरसेप्टर वाहने द्रुतगती मार्गावर तैनात केली आहेत.

- भरत कळसकर, परिवहन उपायुक्त, मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com