पुणे : विघ्नहर साखर कारखान्याची ऊस लागवडीसाठी लकी ड्रॉ बक्षिस योजना

योजनेत प्रत्येक 600 शेतकऱ्यांमधून एक भाग्यवान विजेता निवडला जाणार असून त्यास बुलेट मोटारसायकल बक्षिस म्हणून देण्यात येणार
पुणे : विघ्नहर साखर कारखान्याची ऊस लागवडीसाठी लकी ड्रॉ बक्षिस योजना
पुणे : विघ्नहर साखर कारखान्याची ऊस लागवडीसाठी लकी ड्रॉ बक्षिस योजनाsakal

जुन्नर (पुणे) : येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने पूर्वहंगामी, सुरु व खोडवा या ऊस प्रकारास प्रोत्साहन देणेसाठी तसेच शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी व सुरु ऊसाची लागवड करावी व यावर्षी तुटलेल्या संपूर्ण ऊसाचा खोडवा ठेवावा लकी ड्रॉ बक्षिस योजना जाहीर केली असल्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी सांगितले.

शेरकर म्हणाले, या योजनेत प्रत्येक 600 शेतकऱ्यांमधून एक भाग्यवान विजेता निवडला जाणार असून त्यास बुलेट मोटारसायकल बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याना सुमारे 25 बुलेट जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

विघ्नहर कारखाना व पुणे येथील स्मार्टकेन टेक्नॉलॉजी यांचे संयुक्त विद्यमाने ऊस पिक चर्चासत्र व खोडवा व्यवस्थापन याबाबत कारखान्याचे कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी 9 ते 12 नोव्हेंबर कालावधीत शेतकरी मेळावे आयोजित करण्यात आलेले आहेत. यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे चे माजी शास्त्रज्ञ व ऊस पिकतज्ञ सुरेश माने पाटील यांची व स्मार्टकेन टेक्नॉलॉजीज लि., पुणेचे व्हाईस प्रेसिडेंट विजयराव पाटील यांची व्याख्याने आयोजित केली आहेत. त्यापैकी पहिले चर्चासत्र आज मंगळवार ता.9 रोजी शिरोली बुद्रुक गटात स्व.निवृत्तीशेठ सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाले. याप्रसंगी विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप व सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक भास्कर घुले आणि अधिकारी वर्ग व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

पुणे : विघ्नहर साखर कारखान्याची ऊस लागवडीसाठी लकी ड्रॉ बक्षिस योजना
ST महामंडळाकडून कारवाईला सुरूवात; 376 कर्मचाऱ्यांचं निलंबन!

सत्यशिल शेरकर म्हणाले, ऊस गाळपाचे नियोजन करीत असताना ऊसाचे अधिक उत्पादन व साखर उतारा मिळविणेसाठी योग्य ऊस वाणाची निवड केली जाते. परंतू कारखान्याचे ऊस लागवडीचे नियोजनाप्रमाणे शेतकरी ऊस लागवड करीत नाहीत. तर शेतकरी मोठ्या प्रमाणावर आडसाली ऊसाची लागवड करतात यामुळे ऊस तोडणी प्रोग्राम करताना अनेक अडचणी येतात. ऊस तोडणी सुरळीत व लवकर होण्यासाठी तसेच ऊसाचा उतारा चांगला मिळविणेसाठी कारखान्याकडून सातत्याने प्रयत्न केले जातात याचाच एक भाग म्हणून विघ्नहर मार्फत खोडवा, पुर्वहंगामी व सुरु ऊसासाठी प्रोत्साहनपर लकी ड्रॉ बक्षिस योजना राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की विघ्नहरच्या प्रत्येक गटामध्ये चालु लागवड हंगामात जे शेतकरी पुर्वहंगामी व सुरु या ऊसाची लागवड व चालु गळीत हंगामात तुटणाज्या ऊसाचा खोडवा राखून त्या ऊसाची नोंद कारखाना गट ऑफिसला करतील, त्या प्रत्येक शेतकज्याला या योजनेत सहभागी होता येईल. सदर योजनेमध्ये खोडवा, पुर्वहंगामी व सुरु या सर्व ऊस नोंदीमधून बक्षिस काढणेत येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बक्षिस योजनेकरीता पुढीलप्रमाणे नियम व अटी राहणार आहेत.

1. बक्षिस योजनेसाठी कमीत कमी 0.20 व त्यापुढील क्षेत्राचा विचार केला जाईल.2.ऊस उत्पादक शेतकज्याने शिफारशीत असलेल्या प्रसारीत ऊस वाणाची लागवड केलेली असावी. 3. बक्षिस योजना फक्त पुर्वहंगामी, सुरु व खोडवा ऊस पिकासाठीच राहिल.तरी विघ्नहरच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद, ऊस उत्पादक शेतकरी बंधू व भगिनी यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पुर्वहंगामी व सुरु ऊसाची लागवड करावी तसेच तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवून सदर योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी याप्रसंगी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com