पुणेेेे : 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये दहशत

महेंद्र शिंदे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

खेड-शिवापूर :  गेल्या काही दिवसांपासून एका मोटारीच्या आडवा आलेल्या वाघाचा व्हिडिओ कात्रज घाटातील असल्याचे सांगून सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मुळात हा व्हिडिओ कात्रज घाटातील नसुन दुसऱ्या अज्ञात ठिकाणाचा आहे. मात्र या व्हिडिओमुळे कात्रज आणि खेड शिवापूर परीसरातील नागरीकांमध्ये गोंधळाचे आणि भितीचे वातावरण असून वाघाच्या चर्चेला उधाण आले आहे.

खेड-शिवापूर (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून एका मोटारीच्या आडवा आलेल्या वाघाचा व्हिडिओ कात्रज घाटातील असल्याचे सांगून सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मुळात हा व्हिडिओ कात्रज घाटातील नसुन दुसऱ्या अज्ञात ठिकाणाचा आहे. मात्र या व्हिडिओमुळे कात्रज आणि खेड शिवापूर परीसरातील नागरिकांमध्ये गोंधळाचे आणि भितीचे वातावरण असून वाघाच्या चर्चेला उधाण आले आहे.

त्यातच हा व्हिडीओ "पुण्याजवळ कात्रज घाटात जुन्या बोगद्याच्या अलीकडे आज सकाळी वाघ दिसला" असा मजकूर लिहून फॉरवर्ड केला जात आहे. त्यामुळे कात्रज घाटात वाघ आला वाघ अशी चर्चा सर्वत्र जोरदार सुरु आहे. अनेकजण कात्रज आणि खेड-शिवापूर भागातील आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना व्हिडिओ पाठवून वाघाची विचारपूस करत आहेत.

मात्र मुळात हा व्हिडिओ कात्रज घाटातील नाही. कारण या व्हिडिओत रस्त्याच्या कडेला पत्र्याचे रेलिंग नाही. तसेच कात्रज घाटात डोंगर असलेल्या बाजूला पाणी जाण्यासाठी चर आहेत. तर या व्हिडिओत डोंगराच्या कडेला चर दिसत नाही. तसेच सध्या घाट रस्त्याकडेचे गवत वाळलेले आहे. तर व्हिडिओत हे गवत हिरवेगार दिसत आहे. त्यामुळे दुसऱ्या अज्ञात ठिकाणचा हा व्हिडिओ कात्रज घाटातील असल्याचे सांगून चुकीच्या पद्धतीने फॉरवर्ड केला जात आहे. त्यामुळे कात्रज आणि खेड शिवापूर परीसरातील नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाघाची चर्चा आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये गोंधळाचे आणि भितीचे वातावरण आहे.

याबाबत वन अधिकाऱ्यांना विचारणा केली असता "मुळात कात्रज डोंगररांगामध्ये वाघ नाही. तसेच व्हिडिओत दिसणारा घाट हा कात्रजचा घाट नसून दुसरा अज्ञात घाट आहे. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जाऊ नये. तसेच हा व्हिडिओ कात्रज घाटातील असल्याचे सांगून फॉरवर्ड करू नये," असे त्यांनी सांगितले.

Web Title: Pune: Viral videos cause terror among citizens