

Last Day to File Objections on Pune Voter List
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी उद्या (ता. ३) शेवटचा दिवस आहे. आजपर्यंत १२ हजार ७३८ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. शहरात एकूण ३५ लाख ५१ हजार ४६९ मतदार आहेत. त्यामध्ये ३ लाख ४४६ नावे दुबार असल्याचे समोर आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी प्रारूप मतदार याद्या तपासण्यासाठी घेतल्यानंतर त्यात प्रचंड त्रुटी असल्याचे समोर आले.