

Election Commission Extends Voter List Revision Pune May See Major Drop in Electoral Roll Before August 24
sakal
पुणे : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला केंद्रीय निवडणूक आयोगाने पुन्हा मुदतवाढ दिल्याने सुधारित प्रारूप मतदार यादी आता २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील ११ लाख मतदारांचे पत्ते सापडत नसल्याने आणि दोन लाख मृत मतदार आढळल्यामुळे आगामी प्रारूप यादीत ही नावे वगळली जाणार असून, एकूण मतदारांची संख्या सुमारे १२ ते १३ लाखांनी घटण्याची शक्यता आहे.