

Pune voter list tampering alleged by Congress; CCTV proof submitted demanding strict action.
sakal
पुणे : महापालिकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वीच निवडणुकीच्या गोपनीयतेचा भंग करत भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून मतदारयाद्यांमध्ये बदल व फेरफार केले आहेत. या गंभीर प्रकाराचे सीसीटीव्ही चित्रीकरणही उपलब्ध आहे, असा प्रकार शहरात अन्य ठिकाणीही झाल्याचे नाकारता येत नाही.' असा गौप्यस्फोट करत कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी "या प्रकरणाची सखोल चौकशी करून भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी' अशी मागणी महापालिका आयुक्त व राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.