पुणे : विना मास्क फिरत होते, वसूल केला १२५०० दंड

Pune Walking without a mask police recovered 12500 fines
Pune Walking without a mask police recovered 12500 fines

रामवाडी : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सामाजिक अंतर न राखणे, विना मास्क घराबाहेर पडणे अशा प्रकारे घडत आहे. प्रशासनाने कोरोनाच्या काळात घालून दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर नगररोड भागात काल ( ता. 17 ) कारवाई करण्यात आली यावेळी 12,500 रु दंड वसुल करण्यात आला. 

नगररोड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्य्क आयुक्त सुहास जगताप व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अनिल डोळे यांच्या मार्गदर्शना खाली वरील कारवाई करण्यात आली. अनलॉक नंतर नागरिक मोठया प्रमाणात घराबाहेर पडू लागले आहेत. ठिकठिकाणी वाढदिवस, लग्नकार्य, संक्रांत निमित्त हळदी कुंकू, उदघाट्न असे अनेक कार्यक्रमांना हाजेरी लावली जात आहे. अशावेळी तोंडाला मास्क  बांधणे, सोशल डिस्टंन्सचे पालन  करणे याचा नागरिकांना विसर पडत चालल्याने  कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे. नगररोड क्षेत्रिय कार्यालयाच्या आरोग्य विभागाकडून काल प्रभाग तीन, चार व पाच या ठिकाणी एका दिवसात मास्क न बांधणाऱ्यावर कारवाई करून 12,500 रु दंड वसुल करण्यात आला. 

सदर कारवाई आरोग्य निरीक्षक श्री. मुकुंद घम,संदेश रोडे, सुषमा मुंडे,सचिन गवळी,समीर खुळे,हनुमंत सावळी यांच्या पथकाने केली. व्यवसायिक व नागरिक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली .
१)मास्क न लावणे = २३ केसेस = ११,५००/- रुपये 
२) सार्वजनिक रस्त्यावर अस्वच्छता = ०६  = १०००/- रुपये
   एकूण २९ केसेस = १२,५००/-रुपये


  कारवाई केलेली ठिकाणे
 कल्याणीनगर, वडगावशेरी, नगररोड, गांधीनगर, खराडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com