PMC Elections 2025 : हद्दी ओलांडल्याच्या सर्वाधिक हरकती, पुण्यात सुनावणी पूर्ण; कमला नेहरू, रास्ता पेठ प्रभागावर जास्त सूचना

Pune Politics : महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर तब्बल ५९२२ हरकती दाखल झाल्या असून, भौगोलिक व सामाजिक हद्दींचा भंग झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
PMC Elections 2025

PMC Elections 2025

Sakal

Updated on

पुणे : महापालिकेची प्रारूप प्रभागरचना भाजपला अनुकूल केल्याचा आरोप राजकीय पक्ष, उमेदवार व नागरिकांकडून करण्यात आला होता. त्यावर आलेल्या हरकती व सूचनांवरील दोन दिवसीय सुनावणीसाठी पाच हजार ९२२ पैकी सव्वाआठशे हरकतदारांनी हजेरी लावली. त्यात सर्वाधिक हरकतदारांनी भौगोलिक व नैसर्गिक हद्दी ओलांडल्याबद्दल आपल्या हरकती नोंदविल्या, तर निकषांची पूर्तता करण्यासाठीच भौगोलिक व नैसर्गिक हद्दी ओलांडल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. दरम्यान, सर्वाधिक हरकती कमला नेहरू, रास्ता पेठ प्रभागातून मांडण्यात आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com