

Pune Municipal Corporation has cancelled the planned water cut after the Khadakwasla dam water storage improved significantly.
Sakal
पुणे : पुणे शहरात उद्यापासून (ता. १५) पाणीकपात होणार अशी घोषणा आयुक्त नवल किशोर राम यांनी केली होती. मात्र, त्यानंतर २४ तासांच्या आत महापौर मंजूषा नागपुरे यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. खडकवासला धरणाच्या कॅनॉलमधून पाणी सोडले जात आहे. अशा वेळी पुणेकरांवर पाणीकपात करणे योग्य नाही, असे सांगून बुधवारपासून होणारी पाणीकपात रद्द केली आहे. या निर्णय प्रक्रियेत प्रशासन व सत्ताधारी यांच्यातील गोंधळ समोर आला असला तरी या निर्णयाने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, २२ जुलैनंतर पावसाचा व धरणातील पाणीसाठ्याचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.