दिवसा चटका अन्‌ रात्री गारठा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पुणे - दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारठा असे विषम वातावरण पुणेकर अनुभवत आहेत. कर्नाटक किनारपट्टीवर चक्राकार वारे तयार होण्याची शक्‍यता हवामान खात्याने रविवारी वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली गेला असल्याने रात्रीचा गारठा वाढला आहे. राज्यात सर्वांत कमी तापमानाची नोंद पुण्यात झाली असून, भिरा येथे कमाल तापमान नोंदविण्यात आले. 

पुण्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 1.4 ने वाढून 34.7 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. किमान तापमान सरासरीच्या तुलनेत 1.3 ने कमी होऊन 11.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीवर चक्राकार वारे तयार होण्याची शक्‍यता आहे. तसेच, हिंदी महासागरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून पस्तीशी ओलांडलेल्या किमान तापमानाचा पारा खाली उतरला आहे; तर रात्रीचे तापमानही घटले आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली. शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे.

Web Title: pune weather