पुणे - मे महिन्यातील उन्हाच्या तडाख्यात तापलेल्या पुणेकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्याभरात शहरातील कमाल तापमानात तब्बल सात अंश सेल्सिअसची घट झाली, तर शुक्रवार (ता. ९) पासून पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.