

Pune Weather News Winter Delayed Due to Arnab Cyclone Impact Temperature May Drop in the First Week of November
sakal
पुणे : ऑक्टोबर महिना संपत आला तरी पुणेकरांना अद्याप थंडीची प्रतीक्षा आहे. दिवसभर जाणवणारा उकाडा, वाढलेली आर्द्रता आणि ढगाळ वातावरण यामुळे हवेत गारवा निर्माण होण्यास विलंब होत आहे. शुक्रवारी दिवसभर उकाडा जाणवल्यानंतर सायंकाळी शहराच्या काही भागांत हलक्या पावसाच्या सरी पडल्या. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा प्रभाव आणि त्यामुळे वातावरणातील आर्द्रतेत झालेली वाढ यामागील प्रमुख कारण असल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.