
Summary
राज्यातून मॉन्सूनची माघार घेतल्याने पुण्यात हवामानात बदल जाणवतो आहे.
पहाटे गारवा तर दिवसा "ऑक्टोबर हिट"चा चटका पुणेकरांना जाणवत आहे.
गेल्या दोन दिवसांत कमाल तापमान ३६ वरून ३२ अंशांपर्यंत खाली आले.
राज्यातून मॉन्सूनने माघार घेतली आहे, दरम्यान पुणे शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानात घट झाली आहे, मात्र तरी दिवसभर उकाडा आणि पहाटे हवेत गारवा जाणवत आहे.अचानक बदलेल्या वातावरणामुळे पुणेकर हैराण झाले आहे. दरम्यान जिल्ह्यातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पडत असलेल्या पावसामुळे मागील दोन दिवसात ३६ अंशांवर पोहचलेले कमाल तापमान ३२ अंशांपर्यंत खाली आले आहे.