Pune Rain Update: पुणे शहर आणि जिल्ह्यात उद्या पावसाचा चांगलाच धुमाकूळ राहणार आहे. पुण्याच्या हवामान विभागानं याबाबत इशारा दिला आहे. त्यामुळं उद्या जर तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर पावसापासून सुरक्षेसाठी काळजी घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुढील चार दिवस नेमका पावसाचा अंदाज काय असेल हे देखील हवामान खात्यानं सांगितलं आहे.