Pune : मृतांच्या कुटुंबीयांना लाभ कधी ?

पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत अद्यापही प्रस्ताव प्रलंबित
pune
punesakal

पुणे : कोरोनाच्या काळात जबाबदारी निभावताना महापालिकेतील कायमसेवेत असलेले व कंत्राटी कामगार अशा ८८ जणांनी जीव गमावला. पण, आतापर्यंत केवळ २५ जणांच्या नातेवाइकांना अनुकंपावर नोकरी व २५ लाखांची रोख मदत मिळाली. अद्यापही ६३ जण मदतीच्या प्रतिक्षेत आहे. राज्य सरकारने आरोग्य सेवेव्यतिरिक्त इतर कामे करताना कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांनाही महापालिकेने ५० लाख रुपयांची मदत करावी, असा आदेश दिला आहे. मात्र, महापालिकेने याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

केंद्र सरकारने मार्च २०२० मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा कवच योजना लागू केली होती. महापालिकेने स्वतःच्या अधिकारात ५० लाख रुपये रोख मदत किंवा अनुकंपावर नोकरी व २५ लाख रोख मदत अशी योजना अंमलात आणली. कोरोनामध्ये ८८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सात कंत्राटी कामगार होते, तर ८१ जण कायम सेवक आहेत. यापैकी २५ जणांच्या नातेवाइकांना महापालिकेची मदत मिळाली आहे. पण, ६३ जणांना मदत मिळालेली नाही.

वैद्यकीय कामाव्यतिरिक्त सर्वेक्षण, शोध, त्यांचा मार्ग काढणे, चाचणी केंद्र अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना मृत्यू झाल्यास ५० लाखांचे सानुग्रह अनुदान अथवा विमा काढावा. ‘अ’ व ‘ब’ दर्जाच्या महापालिकांनी हा खर्च स्वतःच्या निधीतून करावा, असे आदेशात नमूद केले आहे. मृत सेवकांच्या नातेवाइकांना मदत करण्याचे धोरण सव्वा वर्षापासून मुख्यसभेसमोर प्रलंबित आहे, तो निर्णय झाल्यास अंमलबजावणी होऊ शकेल, तसेच यापूर्वी ज्यांना २५ लाखांची मदत मिळाली आहे, त्यांना आणखी २५ लाख मिळू शकतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

pune
आरती गायनातून विश्वमांगल्याची कामना

जूनपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावावर या महिन्यात निर्णय घेतला जाईल. महापालिकेने मदत केली आहे. ज्यांना मदत मिळाली नाही, त्यांच्यासाठी राज्य सरकारचा आदेश कसा लागू करता येईल, हे पाहिले जाईल.

- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे महापालिका

कोरोनाकाळात मृत्यू झालेले कर्मचारी - 88

कायम सेवक - ८१

कंत्राटी - ७

मदत मिळालेले सेवक - 25

मदत न मिळालेले - ६३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com