पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे : आता पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनणार आहे. पुणे शहर आता आयटी हब असलेल्या हिंजवडीशी आता मेट्रोने जोडले जाणार आहे. या सेवेमुळे आयटी उद्योगाची भरभराट होईल. या भागाला वाहतूक कोंडी भेडसावत आहे. आयटीयन्स कोंडीत चार-चार तास घालवावे लागतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) सांगितले.

पुणे मेट्रो 3 च्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आले आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, ''पुणे आणि पिंपरीसाठी एक हजार ई-बसेस येतील. तसेच एचसीएमटीआर प्रकल्प राबविला जाणार आहे. पुणे बदलत आहे आणि ते बदलत राहील. पुणे देशांतील सर्वोत्तम शहर होईल. आयटी हब असलेल्या हिंजवडीत मेट्रोशी जोडतो आहे. या सेवेमुळे आयटी उद्योगाची भरभराट होईल. या भागाला वाहतूक कोंडी भेडसावत आहे. आयटीयनस कोंडीत चार चार तास घालवावे लागतात. त्यामुळे आयटीयन्सच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारया आयटी उद्योगातील आयटीयन्स सोयीसाठी हा प्रकल्प उभारला जात आहे. या सेवेमुळे हा उद्योग विस्तारेल''.

दरम्यान, पुणे ही शिवाजी महाराजांची जन्मभूमी, महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक यांची कर्मभूमी आहे, ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्राधान्याने विकासाच्या नव्या दिशेने झपाट्याने वाटचाल करीत आहे, असे केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले.

Web Title: Pune will become Country s Greates city says Chief Minister Devendra Fadnavis