Pune : मेंगडेवाडी गणेश देवस्थानला तीर्थक्षेत्राचा "क" दर्जा मिळवून देण्यासाठी आढळराव पाटील यांना सोबत घेऊन प्रयत्न करणार - वळसे पाटील

श्री. वळसे पाटील म्हणाले डिंभे धरणामुळे काही गावांचा अपवाद वगळता तालुका पाण्याच्या बाबतीत समृध्द झाला आहे पण भविष्यात त्यामध्ये अडथळा होऊ पहात आहे.
d.k walse
d.k walse sakal

पारगाव - मेंगडेवाडी ता. आंबेगाव येथील गणेश देवस्थानला तीर्थक्षेत्राचा "क" दर्जा मिळवून देण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये

मेंगडेवाडी येथील गणेश मंदिरात गणेशोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल बुधवारी काल्याच्या किर्तनाने झाली यावेळी श्री.वळसे पाटील बोलत होते. शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सपत्नीक गणरायाचे दर्शन घेऊन आरतीचा मान स्वीकारला.

याप्रसंगी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे ,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील , अरुण गिरे, पुर्वा वळसे पाटील , सुनिल बाणखेले, माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच बाळासाहेब मेंगडे, सुनिल गवारी, गणेश देवस्थानचे अध्यक्ष भरत मेंगडे, उपाध्यक्ष भास्कर मेंगडे, जिजाभाऊ मेंगडे, भरत फल्ले, तुकाराम भोर, दिलीप रणपिसे, प्रकाश रणपिसे, देवराम मेंगडे, संजय गोरे, पोपटराव मेंगडे, दत्ता मेंगडे, दिलीप चक्कर आदी उपस्थितीत होते.

श्री. वळसे पाटील म्हणाले डिंभे धरणामुळे काही गावांचा अपवाद वगळता तालुका पाण्याच्या बाबतीत समृध्द झाला आहे पण भविष्यात त्यामध्ये अडथळा होऊ पहात आहे. डिंभे धरणाचे पाणी बोगदा पाडून माणिक डोह धरणात नेण्याचा प्रयत्न आहे

d.k walse
Beed News :विद्यार्थी गणवेशाचा घेतलेला निधी सरकारकडून सुपूर्द

हा प्रयत्न यशस्वी झाला तर डिंभे धरण तीन महिन्यात रिकामे होणार आहे या संदर्भात मी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. हा लढा एकट्याचा नसून सर्वांचा आहे. हे भविष्यातील मोठे अवघड संकट थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे.यावर्षी राज्यात पाऊस न पडल्याने सोळा जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. तालुक्यातील लोणी धामणी तसेच सातगाव पठार परिसरात दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसेच जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्न उभा राहिले आहे.

d.k walse
Chatrapati Sambhajinagar : नो-पार्किंगमध्ये कार,भरा दोन हजार दंड !

या दुष्काळी संकटांना सामोरे गेले पाहिजे यासाठी उपलब्ध नैसर्गिक संपत्ती सुरक्षित ठेऊन वाढवणे आपले काम आहे. मेंगडेवाडीतील किचन सभागृहाला २० लाखाचा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी पाच लाखाचा निधी मंजूर केल्याचे सांगितले.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील बोलताना म्हणाले तुम्ही कामे सुचवा निधी उपलब्ध करू माझे सहकारी अरुण गिरे यांनीही उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनेक गावात विकास कामे केली आहे वळसे पाटलांच्या बाबतीत तालुक्यात एकही गाव नाही जिथे त्यांचा निधी पोहचला नाही फक्त माझे लांडेवाडी अपवाद आहे त्यावर वळसे पाटील म्हणाले लांडेवाडीत निधी टाकला आहे त्यावर आढळराव पाटील लगेच म्हणाले लांडेवाडीत तुमचा निधी आहे परंतु तुमच्या निरगुडसर मध्ये माझा निधी नाही भविष्यात ती संधी द्यावी असे ते म्हणाले.

d.k walse
Solapur News : तर आमदार ,खासदारांचीही कंत्राटी पद्धतीने भरती करा ; कंत्राटी भरती विरोधात तरुणांमध्ये व्यक्त होताहेत तीव्र भावना

दिलीप वळसे पाटील म्हणाले 'दिली देशाच्या संसदेत पंतप्रधानांनी मांडलेल्या विधेयकामुळे लोकसभा तसेच विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. तुम्हाला कदाचित वाटेल पूर्वा वळसे पाटील, वहिनी (कल्पना आढळराव पाटील ) त्यासाठी आलेत काय परंतु तसे काही नाही त्याच्या अंमलबजावणीला २०२९ लागेल असे सांगितले.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com