
पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीय. सासरच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेनं आयुष्य संपवलं. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पती आणि सासूला अटक करण्यात आलीय. राणी भागवत कदम असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे.