

Investment Scam in Pune
sakal
पुणे : या प्रकरणी तरुणीने (वय २५, रा. धनकवडी) सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मिलिंद गाडवे आणि प्रकाश चौगुले (रा. सांगली) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीतील मोहननगर परिसरात राहणाऱ्या तरुणीची आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींनी स्वतःला गुंतवणूक सल्लागार सांगत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ‘एका नामांकित कंपनीत गुंतवणूक केल्यास एका वर्षात दुप्पट परतावा मिळेल,’ असे आमिष दाखवत त्यांनी तिला गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. विश्वास ठेवून तरुणीने चार लाख ११ हजार रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यात जमा केले.