
Pune News: एका पुणेकर महिलेनं दिल्लीतील तीन जणांचा जीव वाचवल्याची मोठी घटना समोर आली आहे. भारतीय हवाई दलाच्या मदतीनं ही मोठी कामगिरी पार पडली आहे. हवाई दलाच्या हरक्युलस विमानातून या रुग्णांसाठी आवश्यक असलेले अवयव पुण्याहून दिल्लीला नेण्यात आले. त्यानंतर या अवयवांची या रुग्णांच्या शरिरात यशस्वी रोपण करण्यात आलं. त्यामुळं या रुग्णांचा जीव वाचू शकला. पुण्याच्या वानवडी येथील आर्मीच्या कमांड हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एअरफोर्सच्या मदतीनं ही मोहिम फत्ते केली. यामुळं भारतीय सैन्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.