
पुण्यात आणखी एक हुंड्यासाठी खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या मंडळींनी ५० लाखांची मदत दिली तरी विवाहितेवर अत्याचार करण्यात आला. तिला गॅलरीतून ढकलून देत खूनाचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणी वडगाव शेरीतल्या सिलिकॉन बे सोसायटीतील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.