पुणे : पाण्यासाठी महिलांचे महापालिकेसमोर आंदोलन

मोठ्या प्रमाणात केलेला खर्च यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे
आंदोलन
आंदोलनsakal

शिवाजीनगर : पांडवनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयाजवळ गुंजाळवाडी येथे आमदार निधीतुन पाण्याच्या पाईप लाईनचे काम करण्यासाठी दहा लाख रुपये खर्च केले.मात्र फक्त देखावा म्हणून सदर ठिकाणी पाण्याची चार इंची पाईप लाईन बसवण्यात आली ठराविक कालावधी नंतर ती पाईप लाईन काडून एक इंची पाईप लाईन बसवण्याच आली .ऐवढ्या मोठ्या प्रमाणात केलेला खर्च यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. या सर्व बाबीची सखोल चौकशी व्हावी आणि दोषीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी

करत पांडवनगर येथील महिलांना घेऊन निलेश निकम यांनी महापालिकेच्या गेटसमोर आंदोलन केले.त्यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडे या संदर्भात पत्राद्वारे तक्रार करण्यात आली.

मुख्य पाईप लाईन पासून तो भाग जवळपास ४० फूट उंच असल्याने चार इंची पाइपलाइन मधून पाणी जात नाही.म्हणून दोन इंच पाइपलाइन बसवण्यात आली आहे.विद्यूत विभागामार्फत मोटार बसवून प्राथमिक चाचणी घेतली असता व्यवस्थित पाणी गेले.विद्यूत विभागामार्फत तिथे कायमस्वरूपी मोटार बसवून सुरळीत पाणीपुरवठा होईल याची तातडीने व्यवस्था केली जाणार आहे.

- सुभाष खिलारे कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com