Pune : महिला पोलिसाची बनावट सोशल मिडिया अकाऊंटद्वारे बदनामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे महिलेची बदनामी

Pune : महिला पोलिसाची बनावट सोशल मिडिया अकाऊंटद्वारे बदनामी

पुणे (उंड्री) : महिला पोलीस कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर बनावट अकाऊंट तयार करुन त्याद्वारे अश्लिल व्हिडिओ अपलोड केले. त्यावरुन या महिला पोलीस कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांना अश्लिल मजकुराचे संदेश पाठवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका २६ वर्षाच्या महिला पोलीस कर्मचार्‍यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या नावाने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर त्यांचा फोटो वापरुन दोन बनावट अकाऊंट सुरु करण्यात आले. तसेच इन्स्टाग्रामवर दोन अकाऊंट सुरु करण्यात आले. त्यावर ‘पोलीस मी माझ्या नवर्‍याला सोडून दिले आहे. अ‍ॅटीट्युट गर्ल, माय लाईफ, माय चॉईस, माय मिस्टेक, बिल्लू इन माय सेल्फ असे लिहून तसेच प्रोफाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ अपलोड केले.

हेही वाचा: '२३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की...' NCP चा राणेंवर प्रहार

ते फिर्यादीच्या नातेवाईकांना अश्लिल मजकुराचे संदेश फिर्यादी यांनी पाठविले असल्याचे भासवून फिर्यादीची बदनामी केली. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top