esakal | इस्लामिक स्टेटच्या संपर्कात असलेल्या पुण्याच्या तरुणीचे बारामतीशी कनेक्शन 
sakal

बोलून बातमी शोधा

is women

नॅशनल इनव्हेस्टिंगेशन एजन्सीने (NIA) पुण्यात अटक केलेल्या युवतीचे बारामती कनेक्शन असल्याने खळबळ माजली आहे. 

इस्लामिक स्टेटच्या संपर्कात असलेल्या पुण्याच्या तरुणीचे बारामतीशी कनेक्शन 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती  : नॅशनल इनव्हेस्टिंगेशन एजन्सीने (NIA) पुण्यात अटक केलेल्या सादिया अन्वर शेख या 22 वर्षीय युवतीचे बारामती कनेक्शन असल्याने खळबळ माजली आहे. दिल्ली पोलिसांनी 8 मार्च 2020 रोजी दाखल केलेल्या एका प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी एका काश्मिरी जोडप्याला दिल्लीत अटक केल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सादिया ही त्यांच्याशी कायम संपर्कात होती, IS या दहशतवादी संघटनेशी या जोडप्याचा संबंध असल्याचा संशय आहे. 

सादिया ही अटक केलेल्या जहानजीब साबी वाणी व हिना बशीर या जोडप्याच्या  कायम संपर्कात होती. इसिस बाबतची माहिती भारतात पसरविण्याच्या दृष्टीने सादिया क्रियाशील होती, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. भारतात युवकांची IS ची संघटना बनविण्यासाठी हे सर्व जण क्रियाशिल होते. सन 2015 पासून सादिया IS मध्ये भरती होण्याच्या प्रकीयेसाठी सोशल मिडीयावरुन क्रियाशील होती. जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा तिचा बेत होता व जम्मू काश्मिर पोलिसांना याचा सुगावा लागला होता. 

पाहा Video:पुणे लॉकाडाउन ते लॉकडाउन व्हाया अनलॉक

सादिया हिने बारामतीतील एका महाविद्यालयातील पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. मात्र प्रवेश घेतल्यावर पहिले सहा महिने सदर युवती फक्त परिक्षेपुरतीच आली. त्यानंतर ती महाविद्यालयात फिरकलीच नाही. महाविद्यालयात असल्यापासूनच पोलिसांची तिच्यावर नजर होती. काही वेळा पोलिस तिच्या चौकशीसाठी महाविद्यालयातही येऊन गेले होते. असेही सूत्रांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एका युवतीचे IS सोबतचे कनेक्शन तेही बारामतीतून होते. या घटनेने आज बारामतीत खळबळ माजली. या युवतीबाबत कोणाला फारशी माहिती नव्हती. मात्र ही युवती काहीतरी चुकीच्या कामात सहभागी असल्याचा संशय अनेकांना होता.