Pune News: सायरा राहुल तुरिले हिचा जागतीक विश्वविक्रम प्रस्थापित

सायराची आई शिल्पा दानवे-तुरिले या शास्त्रीय नृत्यांगना आहेत.
Pune News
Pune Newssakal

हडपसर : कु .सायरा राहुल तुरिले या अडीच वर्षाच्या चिमुकलीने बासष्ठ सेकंद फुल स्प्लीट होल्ड करून विश्वविक्रम प्रस्थापीत केला आहे. तीची इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून हा विक्रम करणारी ती एकमेव लहान मुलगी ठरली आहे.

सायराची आई शिल्पा दानवे-तुरिले या शास्त्रीय नृत्यांगना आहेत. त्यामुळे सायराच्या शारिरीक लवचीकतेच्या गुणाची पारख त्यांना झाली. विश्वविक्रमाचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी तीचा सराव घेतला. सायराचे वडील राहुल तुरिले हे हॉटेल व्यवसायीक असून उत्तम क्रिकेट खेळाडू आहेत. त्यामुळे सायराला नृत्याबरोबर खेळाची व शारीरीक कसरतीची देखील आवड निर्माण झाली आहे. सायराने मिळवलेल्या यशाने तीच्यासह आईवडिलांचे कौतुक होत आहे.(Pune News)

प्रत्येक लहान मुला मध्ये एक सुप्त गुण दडला आहे, जो त्याला जगात इतरांपेक्षा आपली वेगळी ओळख निर्माण करण्यसाठी प्रेरक ठरतो. अशा सुप्त गुणाची प्रत्येक पालकाने पारख करून पाल्याला आयुष्यात प्रोत्साहीत करावे, असे तुरले दांपत्याने यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com