पुणे : कॉलेजमध्ये यंदा ध्वजारोहण होणार ऑनलाईन; पण, वेळेचे असणार बंधन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता होणार आहे. त्यामुळे सकाळी ८.३५ ते ९.३५ या एका तासात कोणत्याही महाविद्यालयात किंवा कार्यालयात ध्वजारोहण केले जाऊ नये. सकाळी ८.३५ पूर्वी किंवा ९.३५ नंतर ध्वजारोहण करावे. कोरोना मुळे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या एकत्र येण्यावर मर्यादा आहेत

पुणे : भारताचा ७३ वा स्वांतत्र्य दिन १५ ऑगस्टला साजरा केला जात असताना 'कोरोना'मुळे त्यावर अनेक बंधणे आली आहेत. गर्दी न करता ध्वजारोहण करावे लागणार आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करून 'आत्मनिर्भर भारत' घोषणेचा प्रसार करावा अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता होणार आहे. त्यामुळे सकाळी ८.३५ ते ९.३५ या एका तासात कोणत्याही महाविद्यालयात किंवा कार्यालयात ध्वजारोहण केले जाऊ नये. सकाळी ८.३५ पूर्वी किंवा ९.३५ नंतर ध्वजारोहण करावे. कोरोना मुळे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या एकत्र येण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात नमुद केले आहे. केंद्र सरकारने 'आत्मनिर्भर भारत' ही योजना आखली आहे. त्याचा प्रसार करण्यासाठी महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.

स्वातंत्र्य दिनानिमित्त दिवसभरात वृक्षारोपण, आंतर शालेय, आंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन पध्दतीद्वारे वाद-विवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा, देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धाचे आयोजन करावे.

बाप रे! पुणे जिल्ह्यात ऑगस्टअखेर होणार कोरोना रुग्णांची 'एवढी' संख्या

महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा, सोशल मिडीयाद्वारे निवडक विद्यार्थी, विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाणे, भाषणे आयोजित करावेत, एखाद्या विषयावर वेबिनार योजित करावा, एनएसएस व एनवायकेएस द्वारे देशभक्तीपर ऑनलाईन मोहिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व  डिजिटला माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार संदेश द्यावा याप्रमाणे नाविन्यपुर्ण उपक्रमाद्वारे देखील स्वतंत्रतादिन साजरा, असे  कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी नमूद केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In pune this year the flag hoisting will be online but with the time constraint