बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे येरवडा मध्यवर्ती कारागृहात उद्धाटन

येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन
Pune Yerawada Central Jail prisoner made Diwali items Exhibition
Pune Yerawada Central Jail prisoner made Diwali items Exhibition

विश्रांतवाडी : दि.१४-दिवाळी सणानिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनाचे उद्घाटन संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दंत चिकित्सक डॉ. भारती प्रदीप कुरुलकर, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे ,कारागृह उपमहानिरीक्षक (मुख्यालय ) सुनील ढमाळ ,तुरुंग अधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रमणी इंदूरकर, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शिवशंकर पाटील, उर्मिला पाटणकर, सुषमा कोंढे (दशमुख ) आदी मान्यवर उपस्थित होते.

या वर्षी प्रदर्शनात इतर फर्निचर सोबत बंद्यांनी दिवाळी सणानिमित्त तयार केलेले आकाशकंदील, उटणे, आकर्षक पणत्या, फराळाच्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. बंदीजनांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे यावेळी श्री.कुरुलकर यांनी सांगितले.

शिक्षा झाल्यानंतर कारागृहात आरोपी दाखल होतात तेव्हा त्यांना पुढील बराच काळ बंदिस्त कारागृहात व्यतीत करावयाचा असतो. त्या कालावधीमध्ये बंद्यांना नियमितपणे कारागृहातील विविध कारखान्यामध्ये काम दिले जाते आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. यातून बंदी अनेक कौशल्य आत्मसात करत असतो व एक माणूस म्हणून परत समाजात मिसळण्यासाठी सर्व गोष्टी आत्मसात करत असतो.

कारागृहात मोठ्या प्रमाणात शासकीय विभागांना, कार्यालयांना लागणारे लोखंडी व लाकडी फर्निचर (कपाटे,टेबल,खुर्ची), गणवेश, सतरंज्या , पेपर फाईल, बेडशीट, टॉवेल इत्यादी वस्तू उत्पादित करण्यात येतात. या वस्तूंचा दर्जा उत्तम असल्याने सामान्य नागरिकांकडून या वस्तूंना मोठी मागणी असते.

बंदीजनांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतून विविध नावीन्यपूर्ण वस्तू उत्पादित करून नागरिकांसाठी विक्री करण्यासाठी प्रदर्शनाद्वारे विक्री करण्यात येतात. कारागृह विभागामार्फत दिवाळी मेळा ,रक्षाबंधन मेळा,नाताळ मेळा ,गणपती उत्सवात गणेश मूर्ती विक्री करण्यासाठी मेळावे आयोजित करण्यात येत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com